Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजनाशिक

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक! 

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक! 

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय!


नाशिक : एप्रिल महिन्याला सुरुवात होताच तापमानाचा (Nashik Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. राज्यभरात वाडत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून अनेकांना उष्मघातसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. नाशिक शहरातील उन्हाची तीव्रता देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नाशिककरांची घराबाहेर पडण्यासाठी घालमेल होत आहे. तसेच वाहनचालकांसह नागरिकांना सिग्नलला थांबण्यासाठी दमछाक होत आहे. अशावेळी  नागरिकांना णारा त्रास पाहता शासकीय यंत्रणेनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरात दुपारच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik News)



सध्या नाशिक शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर दुपारी एक ते चार या काळात उष्णतेची तीव्रता अधिक असल्यामुळे नागरिकांचा त्रासही वाढला आहे. या वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी नाशिक पोलिसांनी नवी उपाययोजना काढली आहे. शहरातील जवळपास ३० प्रमुख सिग्नल दुपारी १ ते ४ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी काही ठिकाणी सिग्नल ब्लिंक मोडवर टाकण्यात येणार असून वाहनचालकांना स्वतः काळजी घेत वाहतूक सुरळीत करावी लागणार आहे. नागरिकांना भर उन्हात सिग्नलवर ताटकळत उभे रहावे लागते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांच्या या निर्णयामुळे ट्रॅफिक विस्कळीत होण्याची शक्यात आहे, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपाय अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. (Nashik News)



नाशिककरांना काळजी घेण्याचे आवाहन


नाशिकमध्ये वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा. तसेच भरपूर पाणी प्यावे, टोपी/गॉगल्स/स्कार्फ यांचा वापर करावा असे घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच घराबाहेर पडा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment