हार्वर्डचे डॉ. डेव्हिड सिंक्लेअर यांच्या संशोधनानुसार तुमची नखे लवकर वाढत असतील तर ते एक सकारात्मक लक्षण आहे. कारण याचा अर्थ असा की तुमच्या शरीरात नवीन पेशी तयार होत असून वृद्धत्व कमी वेगाने होत आहे, म्हणजेच तुम्ही जास्त काळ जगणार आहात. तर, दुसरीकडे तुमच्या नखांची वाढ हळूवार होत असेल तर तुमचं वय वेगाने वाढत असल्याचं लक्षण मानलं जातं. या संशोधनानुसार याचा अर्थ तुम्ही जास्त काळ जगणार नाहीत. त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं.
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार चर्चा सुरूआहे. मराठीसह हिंदी ...
नखांच्या वाढीवरून समजे तुमचे आरोग्य कसे आहे ते?
डॉ. सिंक्लेअर यांनी त्यांच्या पॉडकास्ट लाईफस्पॅनमध्ये हा धक्कादायक खुलासा केला असून जो आनुवंशिकता आधारित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा नखे जलद वाढतात कारण त्याच प्रथिने पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होतो, असं वैज्ञानिकदृष्ट्या सांगितलं जातं. यावरून असे दिसून येते की तुमचे शरीर आतून मजबूत असून हळूहळू वयाच्या परिणामांना तोंड देत आहेत.
डॉ. सिंक्लेअर यांच्या मते, नखांची वाढ तुमच्या आहारावर, झोपेवर आणि व्यायामाच्या पातळीवर देखील अवलंबून असल्याचा दावा केला आहे. निरोगी जीवनशैलीमुळे नखे जलद वाढण्यास मदत मिळत असते. त्यामुळे वेळेवर झोपणे, ताण कमी करणे आणि नियमित व्यायाम करणे हे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींमुळे तुमचे नखे निरोगी राहतील आणि तुमचे दीर्घायुष्य होण्याची शक्यता वाढण्यास मदत मिळू शकते.