Saturday, April 19, 2025
Homeक्राईमVasai Crime : अपघात नव्हे घातपात! किरकोळ वादाच्या रागात भावानेच केला बहिणीचा...

Vasai Crime : अपघात नव्हे घातपात! किरकोळ वादाच्या रागात भावानेच केला बहिणीचा खून

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली होती. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा या चिमुरडीचा मृत्यू स्टुलवरून घसरून ती खाली पडल्यामुळे झाला असल्याचे समोर आले होते. मात्र आता ही घटना आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे. चिमुकलीचा हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे (Murder Case) उघड झाले आहे. सात वर्षीय अंजली मिथुन शर्माची हत्या तिच्या १२ वर्षीय भावानेच केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक! 

या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारावर मृत मुलीच्या भावाची चौकशी केली असता आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. किरकोळ वादातून चिडून त्याने बहिणीला पक्कडने मारल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी १८ वर्षाखालील आरोपी असल्यामुळे त्याच्यावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पेल्हार पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

नेमके प्रकरण काय?

गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले. वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात राहणाऱ्या शर्मा कुटुंबात ही घटना घडली. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा ही तिच्या आई-वडील आणि भावासह राहत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आले होते. यावेळी अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टुलवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टुलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्याने गंभीर जखमी झाली असल्याचे सांगितले. (Vasai Crime)

याप्रकारानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी अदखलपात्र मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. परंतु या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर येताच अंजलीचा अपघात नाही तर हत्या झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अंजलीच्या भावाची चौकशी केली असता त्याने अंजलीसोबत झालेल्या एका किरकोळ वादाच्या रागात तिच्या डोक्यात थेट पक्कड घातली आणि तिचा खून झाला, असे समोर आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -