Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवणार

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे ओव्हरस्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, एक्सप्रेसवे किंवा बोगद्यात अनधिकृत पार्किंग, ओव्हरलोडिंग, सीट बेल्ट न लावणे, लेन अर्थात मार्गिकेचे उल्लंघन आदी चुका करणाऱ्यांना स्वयंचलित पद्धतीने दंड आकारला जाईल.



महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर आणि इलेक्ट्रिकल केबल टाकत आहे. आतापर्यंत ५०० किमी. पेक्षा जास्त केबल डक्ट बसवण्यात आले आहेत. प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, आपत्कालीन परिस्थितीत तसेच अपघात झाल्यास तातडीने मदत करणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह कार्यक्षम टोल वसुलीची खात्री करणे हे आहे.



समृद्धी महामार्गावर एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी जुलै २०२४ मध्ये एनसीसी लिमिटेड आणि अॅमनेक्स इन्फोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना काम देण्यात आले. प्रकल्प देखरेखीसाठी निप्पॉन कोई कंपनी लिमिटेड आणि निप्पॉन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती झाली.

ठाण्यातील इगतपुरी ते आमणे दरम्यानचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किलोमीटरचा भाग महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२५ रोजी सुरू करण्याचे नियोजन आहे. या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करण्याची शक्यता आहे. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार आहे. वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. कसारा घाटाला बायपास केल्यामुळे आमणे आणि इगतपुरी दरम्यानचा प्रवास वेळ ९० मिनिटांवरून फक्त ४० मिनिटांवर येईल.

सध्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. मार्ग कार्यरत आहे. इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम झाल्यावर हा ७०१ किमी. चा महामार्ग नागपूर आणि ठाणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ १६ तासांवरुन आठ तासांवर आणेल.
Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या