Gold Rate : जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा दर ?

मुंबई : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू झालेल्या व्यापार युद्धाचा आणि रशिया - युक्रेन लढाईचा आंतरराष्ट्रीय बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अनेकांनी सोन्याकडे बघायला सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याची किंमत आता ९७ हजार ३२० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.



मुंबईत आज म्हणजेच शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याचा दर अर्थात २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा सोन्याचा दर ९७ हजार ३२० रुपये झाला आहे. तसेच मुंबईत आज २२ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा सोन्याचा दर ८९ हजार २१० रुपये झाला आहे. मुंबईमध्ये आज १८ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा सोन्याचा दर ७३ हजार रुपये झाला आहे.



ज्यांच्यासाठी सोन्यातली गुंतवणूक सध्याच्या प्राधान्यक्रमात नाही असे अनेक गुंतवणूकदार गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून चांदीकडे बघत आहेत. यामुळे चांदीची किंमत ९९ हजार ९०० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. मुंबईत आज म्हणजेच शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी एक हजार ग्रॅम अर्थात एक किलो चांदीचा दर ९९ हजार ९०० रुपये झाला आहे.

भारतीय संस्कृतीत सोन्याचांदीला महत्त्व आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदार दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीत गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते सध्या सोनं आणि चांदी हे दोन्ही धातू गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि चांगले पर्याय आहेत.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणार ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालय २० ते २५ मिनिटे अंधारात

शॉर्टसर्कीटमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित कोट्यवधीचा अर्थसंकल्प, पण महापालिका मुख्यालयात लिफ्टच्या

वांद्रे आणि खार पश्चिम भागात रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल

अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरा!

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद