मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)ची सुरूवात झाली होती. आयपीएलचा उद्घाटन सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला होता. बंगलोरच्या के एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकक्युलमचा जलवा पाहायला मिळाला होता.
ब्रँडन मॅकक्युलम कोलकाता नाईट रायडर्ससाठी सलामीवीर म्हणून उतरला आणि त्याने धावांचा डोंगर रचला. त्याने केवळ ७३ चेंडूत १५८ धावांची नाबाद धुंवाधार खेळी केली. या दरम्यान त्याने १३ षटकार आणि १० चौकार फटकावले. मॅकक्युलमच्या या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील केकेआरने तीन बाद २२२ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ १५.१ षटकांत केवळ ८२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळेस बंगलोरचे नेतृत्व राहुल द्रविड करत होता. राहुल द्रविड सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. मॅकक्युलमच्या ऐतिहासिक खेळीमुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले होते.
आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेते राजस्थान रॉयल्स ठरले होते. ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स चॅम्पियन बनले होते. तेव्हा राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला ३ विकेटनी मात दिली होती. हा सामना १ जून २००८मध्ये झाला होता. त्या सामन्यात चेन्नईचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करत होता.
आयपीएलचा पहिला हंगाम जबरदस्त ठरला होता. त्यानंतर टी-२० क्रिकेटमधील लोकांची रूची आणि आवड वाढत गेली.त्यामुळे आयपीएलला मोठी पसंती मिळत गेली. आयपीएल हा ललित मोदी यांचा विचार होता. आयपीएलमुळे प्रचंड पैसा बरसू लागला. आयपीएलमुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात इतकी वाढ झाली की इतर बोर्डाच्या तुलनेत बीसीसीआयने अनेकांना मागे टाकले.
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…
एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा ते कल्याण मार्गादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे…