Shivaji Satam : सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्न परतणार, खुद्द शिवाजी साटम यांनी दिला इशारा!

मुंबई: एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेच्या समाप्तीनंतर, एसीपी आयुष्मान नावाच्या एका नवीन पात्राने टीव्ही शो सीआयडीच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आता प्रद्युम्नची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी असे काही पोस्ट केले आहे, जे पाहून असे मानले जात आहे की त्याचे पात्र परत येऊ शकते.


आजकाल, क्राईम टीव्ही शो सीआयडीचे कथानक अशा ट्रॅकवर पुढे जात आहे ज्याची चाहत्यांनी कधीही कल्पना केली नसेल. या मालिकेत एसीपी प्रद्युम्नचे पात्र मरण पावले आहे. हे पात्र शिवाजी साटम यांनी केले होते. शोमध्ये एसीपी प्रद्युम्न यांची प्रेक्षक खुप वाट बघत आहे. आता असे दिसून येथ आहे की ते शोमध्ये परतणार आहेत.



एसीपी प्रद्युम्नच्या मृत्यूनंतर, अभिनेता पार्थ समथानने शोमध्ये प्रवेश केला आहे, जो एसीपी आयुष्मानची भूमिका साकारत आहे. तो त्याची भूमिका खुप चांगल्या प्रकारे साकारतो आहे. पण चाहत्यांना एसीपी प्रद्युमनला पहायचे आहे. काही काळापूर्वी, अशा बातम्या आल्या होत्या की लोकांकडून होणारी प्रचंड मागणी पाहून, निर्माते एसीपी प्रद्युमनला पुन्हा शोमध्ये आणू शकतात. आता एसीपी प्रद्युम्नने काहीतरी पोस्ट केले आहे, ज्याबद्दल चाहते म्हणतात की त्याने त्याच्या परत येण्याबद्दल संकेत दिला आहे.



शिवाजी साटम यांनी काय लिहिले?


अभिनेते शिवाजी साटम यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “काहीतरी गडबड आहे का?” हा त्यांचा एक प्रसिद्ध संवाद आहे, जो तो गेल्या अनेक वर्षांपासून या शोमध्ये बोलत आहे. ही ओळ फक्त संवाद नाही तर एक भावना आहे. त्याच्या या पोस्टमुळे लोक त्याच्या परत येण्याबद्दल अंदाज लावत आहेत.

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी