Actor Sagar Karande : अभिनेता सागर कारंडेला लुटणाऱ्या चोराचा पर्दाफाश!

मुंबई : अनेक विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या शो मधील सागर कारंडे नेहमीच त्याच्या विविध भूमिकेसाठी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता सागर कारंडे एका मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढला गेला होता. त्यानंतर सागरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. सागरच्या तक्रारीनुसार अखेर पोलिसांनी फसवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेता सागर कारंडेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका महिलेने एक लिंक पाठवली होती. ज्यामध्ये अभिनेत्याला इन्स्टाग्राम पेज लाईक केल्यानंतर पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. तसेच, प्रत्येक लिंकमागे प्रत्येकी १५० रुपये देण्याचं आमीष दाखवण्यात आलं होतं. अभिनेता महिलेच्या जाळ्यात अडकला. सुरुवातीला त्याला एका पेजला लाईक करण्यासाठी १५० रुपये देण्याचं आश्वासन दिलं गेलं. महिलेनं सागरला सुरुवातीला काही पेजच्या लिंक पाठवून त्याला लाईक करायला सांगितलं. सागरनं ते पेज लाईक केल्यानंतर त्याला त्याबदल्यात पैसे दिले गेले. सागर जाळ्यात अडकलाय हे कळताच सायबर भामट्यांनी पुढचं जाळं टाकलं.



सायबर भामट्यांनी सागरला गुंतवणुकीची स्किम देऊ केली. त्यानुसार सागरनं सुरुवातीला २७ लाख गुंतवले. काही काळानं अभिनेत्यानं पैसे काढण्याचाही प्रयत्न केला, पण त्याला सायबर चोरट्यांनी टास्क पूर्ण झाल्यावर पैसे पूर्ण मिळतील असं आश्वासन दिलं. पुढे सायबर चोरट्यांनी ८० टक्के काम झालेलं आहे. यात आणखी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असं सांगितलं. त्यानंतर त्या अभिनेत्यानं १९ लाख आणि त्यावर ३० टक्के कर भरला. अशी एकूण ६१ लाख ८३ हजारांची गुंतवणूक केली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचं समजताच सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेऊन अक्षयकुमार गोपलन या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


दरम्यान, सागर कारंडेनं केलेल्या गुंतवणूकीतून ४ लाख ५९ हजार आरोपी अक्षयनं आपल्या मित्राच्या खात्यातून रोखीनं काढले. त्याचं Crypto चलन आंतरराष्ट्रीय बाजारात खेरेदी आणि विक्री करून नमूद रकमेची विल्हेवाट लावल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

Navnath Ban : 'खोटं बोला, रेटून बोला' हाच राऊतांचा पॅटर्न; पुरावे शून्य, केवळ अफवांचा बाजार नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा

"पराभव जवळ दिसताच राऊतांची सकाळची बडबड सुरू!" : नवनाथ बन मुंबई : "मुंबई महानगरपालिकेत उबाठा आणि मनसेचा पराभव आता

BMC Election 2026 : मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?

मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे