Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! महापालिकेचे नागरिकांना आवाहन

ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा (Summer Season) असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणीटंचाई (Water Shortage) निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, व नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे व पाण्याची बचत करावी असे आवाहन ठाणे (Thane News) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



शक्यतो गाड्या धुऊ नयेत त्याऐवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात. अंगणात शक्यतो पाणी मारू नये, नळ सुरू ठेवून कपडे धुणे, भांडी घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती दुरुस्त करावी. तसेच सोसायटीतील गळकी टाकी, पाईप, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होणार याची दक्षता घ्यावी, अन्यथा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा तसे आढळून आल्यास संबंधीत इमारतीचे / सोसायटीचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल. शक्यतो रोज आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये. स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा. इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरु नये.


पाण्याचा अनावश्यक साठा करु नये व साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती/ सोसायटी/ संकुलांमधील तरण तलावास पिण्याचे पाणी वापरू नये व वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करून एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत. कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे असे केल्यास पाण्याची बचत व मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुऊन निर्माण होणारे निरुपयोगी पाणी साठवण करून पुढचे दोन दिवस फ्लश, बाथरूम धुणे, फरशी पुसणे, गाड्या धुणे व बगीचा आदीसाठी वापरावे. 'पाणी अनमोल आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय/ नासाडी टाळा' असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

“सर, माझं ब्रेकअप झालंय...” Gen Z कर्मचाऱ्याचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये सुट्टीसाठी ईमेल लिहिणं ही रोजचीच बाब असते. पण अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०