Riteish Deshmukh : रितेश देशमुखने केले चाहत्यांजवळ मदतीचे आवाहन; काय आहे प्रकरण जाणून घ्या

  96

मुंबई : अवघ्या जगाला वेड लावणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखची खास ओळख आहे. रितेशने आजपर्यंत मराठी हिंदी अशा दोनी माध्यमांतील सिनेसृष्टीसाठी काम केले आहे. लय भारी चित्रपटापासून ते वेड चित्रपटापर्यंत रितेशने चाहत्यांची मने जिंकली. आता रितेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तत्पूर्वी रितेशने त्याच्या चाहत्यांजवळ मदत मागितली आहे.



रितेश देशमुख हा नेहमीच चर्चेत असतो. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटानंतर आता रितेशचा 'राजा शिवाजी' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिवाजीमहाराजांवर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी रितेशचा एक लूक व्हायरल झाला होता त्यानंतर चर्चाना उधाण आले होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये रितेशने या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर पोस्ट केले होते. त्यानंतर आज रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली आहे. ज्या मध्ये रितेश चाहत्यांजवळ मदत मागत आहे.





काय म्हणाला रितेश ?


"आम्ही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत आहोत. त्या चित्रपटाचं नावं 'राजा शिवाजी' आहे. आम्ही या चित्रपटाचं टायटल लोगोच्या शोधात आहोत. आपल्यापैकी कोणी जर डिझाइनर असेल,कोणी कॅलिग्राफी आर्टिस्ट असतील तर कृपया आपण या चित्रपटावर आपले डिझाइन तयार करावेत आणि खाली दिलेल्या ईमेलच्या पत्त्यावर पाठवावे. ज्यांचं डिजाईन या चित्रपटासाठी निवडलं जाईल त्यांना आम्ही क्रेडिट देऊ. हा चित्रपट आपला स्वतःचा आहे असं समजून कृपया डिजाईन तयार करा" असं अभिनेता रितेश देशमुख म्हणाला. दरम्यान तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Comments
Add Comment

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे