पतीशी झालेल्या वादातून मातेने दोन छकुल्यांसह घेतली खाडीत उडी

तिर्लोट- आंबेरी पुलावरून केली आत्महत्या : देवगड हादरले


गावावरुन मुंबईला घेऊन चला ... मुंबईला असलेला पतीला केला शेवटचा फोन


देवगड : पती -पत्नीमधील भांडण विकोपाला गेले अन रागाच्या भरात पतीपासून तीने कायमचेच दुर होण्याचा निर्णय घेतला. आपल्या २ लेकरांना छातीशी घेत तीने पुलावरून खाडीत झोकून दिले. या घटनेने देवगड तालुका हादरला आहे. देवगड तालुक्यातील तिर्लोट- आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. श्रीशा सुरज भाबल (२४),श्रेयश (५) व दुर्वेश (४) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना १७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. पतीशी झालेल्या किरकोळ वादातून श्रीशा हिने मुलांसमवेत आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिर्लोट- आंबेरी येथील सुरज सुहास भाबल यांच्याशी श्रीशा हिचा २२ जून २०१८ रोजी विवाह झाला. श्रीशाचे माहेर कर्नाटक रायचूर येथील असून ती आई वडिलांसमवेत कल्याण येथे राहत होती. तिचे पती सुरज भाबल हे नोकरीनिमित्त मुंबई दादर येथे राहत असून रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती. श्रीशा ही तिचे मुलगे श्रेयश व दुर्वेश यांच्यासमवेत सासरी तिर्लोट आंबेरी येथे सासरे सुहास शिवराम भाबल, सासू सुहासिनी, दीर मिलींद यांच्यासमवेत राहत होती. १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास श्रीशा हिने आपल्या पतीशी फोनवरून मुंबईला घेवून जाण्याबाबत बोलत होती. परंतु पती सुरज याने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने तीला मुंबईला घेवून जाण्याबाबत नकार दिला. यावेळी रागाने श्रीशाने सासू व सासरे यांना न सांगता त्याच सायंकाळी ५.४५ वा. मानाने दोन्ही लहान मुलांना घेवून घरातून निघून गेली. तीचा आजूबाजूला शोध घेवूनही ती मिळाली नाही. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास आंबेरी जेटीजवळ श्रीशाचा मृतदेह आढळून आला. तसेच तेथीलच पिराचे पोय याठिकाणी श्रेयशचा मृतदेह सापडला. तर दुर्वेशचा मृतदेह १७ एप्रिल रोजी दुपारी आंबेरी खाडीपात्रातच कातळी किनारी सापडला.



घटनेची माहिती श्रीशाचे सासरे सुहास भाबल यांनी विजयदुर्ग पोलिस स्थानकात दिली. देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी घनःश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण, पोलिस हवालदार प्रशांत जाधव, सुनिल पडेलकर, पो. कॉ. बाबाजी कांदे, प्रशांत गावडे, महिला पोलिस वनिता पडवळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी तेथील रामकृष्ण जुवाटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुलदीप लिंगायत, पोलीस पाटील अमित घाडी उपस्थित होते. विजयदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Health Tips : ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास 'या' गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, अशी घ्या आरोग्याची काळजी

जर तुम्हाला हाई ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला २०२५ मध्ये आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. नुकताच यासंबधित

Salman khan : बॉलीवूडच्या भाईजाननं अचानक बदललं आपल्या आगामी चित्रपटाचं नाव; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिला 'हा' सामाजिक संदेश

बॉलीवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानने आपल्या आगामी चित्रपटाचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. नुकताच एक सोशल

धुरंधर द रिंवेज नंतर 'धुरंधर ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार ?

रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. धुरंधर रिलीज झाल्यानंतर

Oscars Winners 2026 : 'वन बॅटल आफ्टर अनदर'ने ६ तर सिनर्सने जिंकले ४ पुरस्कार, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी

ऑस्कर 2026 च्या विजेत्यांची घोषणा झाली असून यंदा सिनर्स आणि 'वन बॅटल आफ्टर अनदर' बरोबरच अनेक चित्रपटांनी आपली दमदार