मुंबई ते रायगड.. सुरू आहे सत्तेचा डावपेच!

मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि सगळे पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरलेत. ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच मुंबई – इथे शिंदे गट सतत गळती लावतेय. कालपरवा संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.


यापूर्वीही अनेक माजी नगरसेवकांनी हात झटकलेत. मुंबईत शिंदे गट ताकद वाढवत असतानाच रायगडमध्ये वेगळीच रणधुमाळी सुरूय. इथे राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आणि त्यांच्या विरोधात ठाकरे, शिंदे, भाजपचे आमदार – सगळेच थेट भिडलेत.



तटकरे कुटुंबीयांचं रायगडवर बरेच वर्ष वर्चस्व राहिलंय. पण आता खुद्द महायुतीतच त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे. शिंदे गटाचे आमदार आदिती तटकरे पालकमंत्री होऊ नयेत यासाठी चक्क नाराजी व्यक्त करतायत.


यातच शेकापचा पूर्ण पत्ता गायब झालेला दिसतोय. जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय पाहता, शेकापचा गड असलेला रायगड आता पूर्णपणे ढासळलाय. आणि हो या सगळ्या राजकारणात भाजप आपली सत्ता मजबूत करत चाललेय.


तर एकंदरीत मुंबई आणि रायगडमध्ये राजकारण प्रचंड तापलंय. एकीकडे ठाकरे गट गळती थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे शिंदे गट सत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे.


पण या सगळ्या धावपळीत लोकांचे प्रश्न कुठे आहेत? ते अजूनही पाण्यासाठी, रस्त्यांसाठी आणि विकासासाठी वाट बघतायत… आता बघायचं... या राजकारणात पुढचं पाऊल कोण टाकतो, आणि कुणाचा डाव उलटतो! तुम्हाला काय वाटतं, खाली कमेंट करुन नक्की सांगा.

Comments
Add Comment

Sachin Siwach : राष्ट्रकुल खेळ २०२६: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच 'राऊंड ऑफ १६' मध्ये

ग्लासगो : भारताचा स्टार बॉक्सर सचिन सिवाचने शनिवारी पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या 'राऊंड ऑफ १६' मध्ये प्रवेश

Hair Loss : तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात? कमी वयातच केस पातळ होतायत ?

जाणून घ्या महिला आणि पुरुषांमधील केस गळतीची मुख्य कारणे व उपाय! सध्याच्या काळात स्त्री आणि

Healthy Food Oats Curd Rice : ओट्स दही भात, एक चविष्ट आणि आरोग्याला लाभदायी पदार्थ

ओट्स दही भात (Oats Curd Rice) एक रुचकर आणि आरोग्यासाठी लाभदायी असा पदार्थ आहे. फक्त एक बाउल ओट्स दही भात खाल्ला तरी त्यातून

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण चवीशी तडजोड नको ? दुधी भोपळ्यापासून बनवा हे ४ भन्नाट पदार्थ

वजन कमी करायचं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर अळणी, बेचव किंवा कंटाळवाणा आहार येतो. विशेषतः दुधी भोपळा (Lauki)

Salman Khan : सलमान खानच्या मध्यरात्रीच्या पोस्टने उडवली खळबळ; 'डर गया... मर गया' म्हणत नेमकं काय सांगितलं?

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील

Marathi Movie : "मामाच्या गोव्याला जाऊया" चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अंकुश चौधरीचा खतरनाक 'डॉन' अवतार अन् तगडी स्टारकास्ट!

बॉलीवूडच्या 'धम्माल'ला देणार टक्कर! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, सस्पेन्स अन् ॲक्शनचा