पुण्यात 'खोट्या बाकरवडी'चा पर्दाफाश; चितळे बंधूंचं नाव वापरून पुण्यात गंडा!

  60

पुण्यात राहून ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हे नाव ऐकलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. पण… याच नावाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. आणि त्यात बळी पडलेत ‘बाकरवडी’चे चाहते… ‘बाकरवडी’ची ही लोकप्रियता कुणाच्या तरी फसवणुकीचं साधन बनली.. आज आपण ऐकणार आहोत ‘खोट्या बाकरवडी’च्या फसवणुकीची खरी कहाणी!


चितळे स्वीट होम या दुकानानं लोकांची दिशाभूल करत चितळे बंधूंच्या नावाखाली आपली बाकरवडी विकली. चितळे बंधूंचे स्वीय सहायक नितीन दळवी यांनी ग्राहकांकडून ऐकले की बाकरवडीची चव बदललीय!.. ते चक्रावले… त्यांनी बाजारातून काही पाकिटं घेतली आणि पाहणी केली. आणि इथेच उलगडा झाला एका मोठ्या फसवणुकीचा!



सदाशिव पेठेतील ‘चितळे स्वीट होम’ नावाच्या दुकानाने एक नवाच ब्रँड बाजारात आणला होता... ‘पुणेरी स्पेशल बाकरवडी’… पण पॅकिंगवर मात्र वापरले गेले ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचे अधिकृत ई-मेल, ग्राहक क्रमांक, संपर्क तपशील! हे पाहून नितीन यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


विश्रामबाग पोलिसांनी ‘चितळे स्वीट होम’चे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर IPC कलम ३१८(२), ३५० आणि IT कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत भागीदार इंद्रनील चितळे यांनीदेखील ब्रँडचा सरळ सरळ गैरवापर केल्याबद्दल स्वतंत्र तक्रार दाखल केलीय.


प्रसिद्ध नाव, नावाजलेली चव, आणि ग्राहकांचा विश्वास… हे सगळं एका चुकीच्या वापराने उध्वस्त होऊ शकतं. ब्रँड म्हणजे केवळ नाव नाही, तो असतो गुणवत्तेवर उभा असलेला विश्वास... तोच जर खोट्या नावाने विकला गेला, तर फसवणूक ही केवळ कंपन्यांची नव्हे तर आपल्या भावनांचीही होते.


म्हणूनच, एखादं उत्पादन विकत घेताना त्याच्या मूळ स्त्रोताची खातरजमा करा. ब्रँडवर प्रेम करा, पण डोळस व्हा. आपला विश्वास कोणी विकत घेऊ नये, यासाठी सजग राहा...

Comments
Add Comment

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची