मुंबई: आजकाल निस्तेज आणि कोरड्या केसांच्या समस्येने साऱ्यांनाच ग्रासले आहे. अशातच अनेकजण केस सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे तेल आणि शाम्पूचा वापर करतात. मात्र काही वेळेस चुकीचे तेल लावल्याने केस खराब होतात.
प्रत्येकाचे केस वेगवेगळे असता. यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे तेल सूट होतात. अशातच कोणत्या केसांसाठी कोणते तेल गरजेचे हे समजून घेणे गरजेचे असते.
केसांसाठी योग्य तेल तुमचा स्काल्प आणि केसांच्या क्वालिटीवर अवलंबून असतो. यावरून तुम्हाला समजते की केसांना नारळाचे तेल, आवळ्याचे तेल की इतर कोणत्या प्रकारचे तेल सूट होते.
जर तुमचा स्काल्प तेलकट असेल तर सगळ्यात चांगले बदामाचे तेल असते. दरम्यान, स्काल्पला खाज अथवा जळजळ होत रोझमेरी अथवा लेवेंडरचे तेल योग्य आहे.
याशिवाय तुम्ही केसांना पाण्यात टाकूनही टेस्ट करू शकता. यावरून तुम्ही केसांसाठी योग्य हेअर ऑईल निवडू शकता. ही ट्रिक सोपी आहे.
तुमचे केस स्वच्छ पाण्यात टाका. ५ मिनिटे ठेवा. जर केस तरंगत असतील तर केसांची पोरसिटी लो आहे. यासाठी तुम्हाला ग्रेपसीड ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, आर्गन ऑईल ही तेल फायदेशीर आहे.
जर केस पाण्यात बुडाले तर केसांची पोरसिटी हाय आहे. अशातच ऑलिव्ह ऑईल, नारळाटे तेल यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. जर केस पाण्याच्या मधोमध राहिले तर पोरसिटी मिडियम आहे. यासाठी बदामाचे तेल फायदेशीर आहे.