डोंबिवली : महाराष्ट्रातील खेळाडू कायम चर्चेत असतात. अशातच आता डोंबिवलीकरांची मान उंचावणारी बातमी समोर आली आहे. डोंबिवलीतील तरुण खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा उद्या (दि १८) पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात संप्पन्न होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३-२४ ची घोषणा केली आहे. शुक्रवारी १८ एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात या पुरस्कारांचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड त्यांच्या मागील वर्षातील उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश, सातत्य आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांसारख्या निकषांवर आधारित असते. विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या योगदानाला आणि त्यांच्या कठोर परिश्रमाला समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळांचा समावेश असतो.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी डोंबिवलीतील ३ तरुण खेळाडू पात्र ठरले आहेत. डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे प्रशिक्षणार्थी असणारे राही नितीन पाखले आणि आदर्श अनिल भोईर या डोंबिवलीकर खेळाडूंना जिम्नॅस्टिक्समधील ‘ट्रॅम्पोलीन’ या क्रीडा प्रकारामध्ये २०२३-२४ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे भोईर जिमखान्यातील क्रीडा मार्गदर्शक आणि राही व आदर्श यांचे प्रशिक्षक, पवन मुकुंद भोईर यांना ६ महिन्यांपूर्वी २०२२-२३ या वर्षासाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला होता. या गुरु-शिष्यांचा एकाच मंचावर होणारा सन्मान ही ‘क्रीडा नगरी’ डोंबिवलीसाठी निश्चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. या घटनेने डोंबिवली शहराच्या शिरपेचात यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…
मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…
रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…