Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीAamir khan: आमिर खानचं साउथ इंडस्ट्रीत पदार्पण; ‘कुली’ चित्रपटात रजनीकांतसोबत झळकणार!

Aamir khan: आमिर खानचं साउथ इंडस्ट्रीत पदार्पण; ‘कुली’ चित्रपटात रजनीकांतसोबत झळकणार!

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता साउथ इंडस्ट्रीत (South industry) पदार्पण करत असून, तो सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि नागार्जुन(Nagarjuna) यांच्यासोबत आगामी ‘कुली’(coolie) चित्रपटात झळकणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कुली’ चित्रपटात आमिरची छोटी भूमिका

सध्या चर्चेत असलेल्या ‘कुली’ या चित्रपटात आमिर खान एका छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याबाबत कन्नड अभिनेता उपेंद्र राव यांनी त्यांच्या ‘४५’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माहिती दिली. त्यांनी सांगितले, “आमिर खान हा देखील ‘कुली’चा भाग आहे. त्याची भूमिका लहान असली तरी प्रेक्षकांसाठी खास असेल.”

रजनीकांत, नागार्जुन आणि उपेंद्र यांची तगडी स्टारकास्ट

या बिग बजेट चित्रपटात रजनीकांत एका नकारात्मक भूमिकेत झळकणार आहेत, तर उपेंद्र राव मुख्य भूमिकेत दिसतील. याशिवाय चित्रपटात नागार्जुन, श्रुती हसन, सत्यराज आणि सौबिन शाहीर यांसारखे स्टार कलाकारही आहेत.

रजनीकांतसोबत कामाचा अनुभव खास – उपेंद्र

हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना उपेंद्र म्हणाले, “मी या चित्रपटासाठी फक्त रजनीकांतमुळे होकार दिला. मी त्यांना द्रोणाचार्य मानतो आणि स्वतःला एकलव्य. त्यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.”

‘कुली’ १४ ऑगस्ट २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. साउथच्या सुपरस्टार्ससोबत बॉलिवूडमधील आमिर खानच्या सहभागामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रेक्षकांसाठी ही एक मेजवानीच ठरणार यात शंका नाही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -