जीवनशैलीच्या गरजांचे अद्वितीय मिश्रण! 'एम ९' आणि 'सायबरस्टर' कारचा रिव्ह्यू पहाच

  46

मुंबई : जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचा लक्झरी विभाग 'एमजी सिलेक्ट'ने आपली अनोखी वैशिष्ट्यपूर्ण वाहने 'एमजी एम ९ प्रेसिडेंशियल लिमोझिन' आणि जगातील सर्वात वेगवान एमजी रोडस्टर- 'सायबरस्टर' सादर केली. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत होणाऱ्या डिलिव्हरीपूर्वी केवळ प्री-बुकिंग केलेल्या मुंबई आणि ठाण्यातील ग्राहकांसाठी या दोन नव्या कारच्या सर्वसमावेशक पूर्वावलोकनासाठी (प्रीव्ह्यू) हे प्रदर्शन मर्यादित होते.



एमजी एम ९ हे वाहन जागा (स्पेस), आराम (कम्फर्ट) आणि टिकाऊपणाच्या (सस्टेनिबिलिटी) बाबतीत एक नवीन मापदंड स्थापित करते. या लिमोझिनमध्ये आलिशान सेकंड-रो केबिन आहे, ज्यात १४ विविध पद्धतीच्या ॲडजस्टमेंट्स, ८ मसाज मोड्स, व्हेंटिलिशन आणि हिटिंग असलेल्या प्रेसिडेंशियल सीट्स आहेत. या सीट्स आधुनिक ग्राहकांसाठी अतुलनीय आराम आणि उच्च दर्जाची सुविधा देतात. चालकाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी डिझाइन केलेली एमजी एम९ ही कार म्हणजे आलिशान इंटिरियर डिझाइन आणि महत्त्वाकांक्षी जीवनशैलीच्या गरजांचे अद्वितीय मिश्रण आहे.


'सायबरस्टर' ही कार 'क्लासिक एमजी बी'ची ख-या अर्थाने आध्यात्मिक उत्तराधिकारी आहे. 'सायबरस्टर'मध्ये लक्झरीला तंत्रज्ञानाशी जोडणारे इलेक्ट्रिक सिझर डोअर्स आणि कन्व्हर्टिबल रूफ टॉप आहे. इलेक्ट्रिक सिझर डोअर्स पाच सेकंदात उघडतात. हे दरवाजे रिमोट ऑपरेशनद्वारे उघड-बंद करता येतात आणि विशेष म्हणजे, ते एका टच बटणाने ऑपरेट होतात.


'सायबरस्टर' ही कार दिसायला आकर्षक आहेच, पण त्याचबरोबर तिच्या ड्युअल-मोटर कॉन्फिगरेशनमधून ५१० पीएस आणि ७२५ एनएम टॉर्क निर्माण होतो. कार्यक्षमतेला महत्त्व देणा-या सायबरस्टरने राजस्थानातील सांभर तळ्याजवळ केवळ ३.२ सेकंदात (०-१०० किमी प्रतितास) आशियातील सर्वाधिक वेग पकडण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. या रिव्ह्यू कार्यक्रमात 'एमजी सिलेक्ट'ची भारतातील लक्झरी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात दमदार उपस्थिती स्थापित करण्याची आणि कार्यक्षमतेसह प्रगत तंत्रज्ञानाचा संगम असलेले पर्याय सादर करण्याची बांधिलकी दर्शवण्यात आली.

Comments
Add Comment

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना आज मिळणार हक्काचे घर

पहिल्या टप्प्यातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण मुंबई : आशियातील नागरी

ICC वनडे क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर, बाबर आझमची घसरण

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा

येत्या १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत घरोघरी तिरंगा फडकणार, महापालिकेचे नागरिकांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन

मुंबई (खास प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी

चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन प्रशासनाद्वारे ५० टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यावर, चीन आणि