Monday, October 27, 2025
Happy Diwali

Simple Tricks For Pimple : आंबा खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग 'या' टिप्स आहेत बेस्ट

Simple Tricks For Pimple : आंबा खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग 'या' टिप्स आहेत बेस्ट

कोकणातलो हापूस आंबो कोणाक आवडाचो नाय? ही तर एक म्हणं आहेच मात्र हे ही खरं आहे की, चव आणि पौष्टिकतेच्या दृष्टीनेही आंबा हा भारीच आहे. त्यामुळेचं आंब्याला फळांचा राजा असं म्हंटल जातं. उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असल्यामुळे किती आंबे खाऊ आणि किती नको असे आंबा प्रेमींना होतं असते. वर्षातून एकदा येणा-या या रसाळ आंब्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हा आंबा खाताना कशाचीही पर्वा न करता यावर तुटून पडतात. काही व्यक्ती तर दररोज जेवणाबरोबर एक आंबा नक्की खातात. मात्र आंब्याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे अनेकांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याच्या समस्या देखील निर्माण होतात. आंबा खाल्याने काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर फार मोठे फोड येतात. ते चेहऱ्यावर फार वाईट दिसते आणि दुखतात देखील. त्यामुळे आज या लेखातून आंबा खाल्ल्याने तुमच्याही चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येत असतील तर काय करावे याबद्धल जाणून घेऊ.

योग्य प्रमाणात आंब्याचे सेवन

आंबा फार उष्ण असतो. आंबा, फणस ही फळे चवीला फार छान आहेत. मात्र याचे जास्त सेवन केल्याने पोटात देखील गरम पडते. त्यामुळे रोज सलग आंबा खाऊ नका.

रात्री आंबा खाऊ नका

शक्यतो आंबा नुसता खाऊ नये. जेवणाच्यावेळी सर्व पदार्थांसोबत आंबा हे फळ खावे. काही व्यक्ती रात्री जेवणानंतर आंबा खातात मात्र असे केल्याने पोटात गरम पडते आणि चेहऱ्यावर देखील पिंपल्स येऊ शकतात.

हळद आणि साय

आंबा खाल्याने उन्हाळ्यात जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर रात्री झोपण्याआधी दुधाची साय आणि त्यात थोडी हळद मिक्स करून घ्या. ही पेस्ट पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा. ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

मध आणि हळद

काही व्यक्तींची त्वचा फार कोरडी असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी मध, हळद आणि त्यात थोडं तूप टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने पिंपल्सच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.

बर्फ

चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स आले असतील तर तुम्ही बर्फ लावू शकता. बर्फ हा चेहऱ्याला थंडावा देईल.

सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेले फेस वॉश वापरा

सॅलिसिलिक अ‍ॅसिड हे त्वचेचे एक्सफोलिएटर आहे जे जास्तीचे तेल साफ करते आणि ब्लॉक केलेले छिद्र उघडते.

Comments
Add Comment