MS Dhoni : एमएस धोनी दिसणार रोमँटिक अवतारात; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार क्रिकेटपटू एमएस धोनी नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर आपल्या स्टाईलने चाहत्यांना खुश करतो. याचं क्रिकेटच्या मैदानात तो एक उत्तम बाबा आणि नवरा असल्याचं अनेकदा व्हिडिओ मधून पाहायला मिळालं. आता धोनी क्रिकेटच्या मैदानात नाही तर एका नव्या अंदाजात जाहिरातीत दिसणार आहे. तो कायम पडद्यावर छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसत असतो. आता धोनी एका नवीन प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्माता करण जोहरने नुकतीच एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.



करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एमएस धोनी 'लव्हर बॉय'ची भूमिका साकारणार आहे. याची हटके झलक करणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे. यातून धोनीचा एक नवीन लूक आणि अवतार समोर येणार आहे. करणने शेअर केलेल्या व्हिडीओत क्रिकेटपटू एमएस धोनी रोमँटिक अंदाजात दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीलाच 'पहिल्यांदाच एमएस धोनी रोमँटिक अवतारात' असे लिहिलेले पाहायला मिळत आहे.


व्हिडीओमध्ये धोनीच्या हातात हार्टच्या आकाराचा फुगा पाहायला मिळत आहे. तो म्हणतो की, "तू सोबत असतेस तेव्हा प्रत्येक प्रवास सुंदर बनतो. " या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते धोनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत. एमएस धोनी करण जोहरच्या नवीन जाहिरातील दिसणार आहे. याची एक झलक करणन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याआधी देखील धोनीने अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे. मात्र ही जाहिरात खास असणार आहे. कारण यात धोनीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या