वांद्रे-वर्सोवा पुलाला स्थानिकांचा विरोध

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई सागरी किनारा मार्गावरील वांद्रे-वर्सोवा पुलाला तीव्र विरोध दर्शवत जुहू येथील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणपूरक समुद्राखालील बोगद्याचा पर्याय सुचवला आहे. ‘जुहू बीच वाचवा’ मोहिमेअंतर्गत आज मुंबईत पत्रकार परिषदेत उम्मेद नाहाटा, डॉ. हिमांशू मेहता, श्रीमती उषाबेन पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


डॉ. हिमांशू मेहता यांनी यावेळी सांगितले, “हा प्रकल्प जुहू चौपाटीच्या नैसर्गिक सौंदर्याला हानी पोहोचवेल आणि पर्यावरणीय समतोल ढासळेल. दररोज लाखो पर्यटक या बीचला भेट देतात. त्यामुळे समुद्र पुलाऐवजी ऐवजी समुद्राखालील बोगदा हा अधिक योग्य आणि शाश्वत पर्याय आहे.”या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी न्यायालयाने अधिक कागदपत्रांची मागणी केली होती, जी पूर्ण करून आता नव्याने याचिका सादर करण्यात आली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी सोशल मीडियावर जनजागृती, शांततामय रॅली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.


चळवळीच्या माध्यमातून जुहू चौपाटीचे सौंदर्य, पर्यावरणीय समतोल आणि दीर्घकालीन शाश्वतता यांचे रक्षण करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व भारतीय नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले, जेणेकरून मुंबईच्या किनारपट्टीचे वैभव आणि पर्यावरण अबाधित राहील. जुहू बीचच्या नैसर्गिक सौंदर्याचे संरक्षण पर्यावरणीय समतोल राखण्याची गरज समुद्राखालील बोगदा हा शाश्वत पर्यायस्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या हितांचे रक्षण‘जुहू बीच वाचवा’ मोहीम पुढील काळातही विविध उपक्रमांद्वारे आपला आवाज बुलंद करत राहणार आहे.

Comments
Add Comment

बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग !

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ आणि इतर रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर घर करणाऱ्या अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार? सचिन धानजी मुंबई : दक्षिण