ठाणे : वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत असल्याने प्राण्यांनी मानवी वस्तीचा रस्ता धरला आहे. वाघ, बिबट्या नंतर आता हरणाने सुद्धा मानवी वस्तीत शिरकाव केल्याचं पाहायला मिळालं आहे. अशीच घटना ठाण्यात घडली आहे. काल (दि १४) ठाण्यातील भरवस्तीत एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये हरीण अडकलं. या हरीणाची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे.
Pune News : सलग दुसऱ्या दिवशीही प्रसुती नंतर मृत्यू ; आरोग्य यंत्रणा वेंटीलेटरवर, नक्की चाललंय काय?
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात असलेल्या हायपर सिटी मॉलनजीक एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वनविभाग आणि वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या हरणाची सुखरूप सुटका केली. वन विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये मुक्त करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार हे हरीण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून अन्नासाठी मानवी वस्तीत आल्याचं समजतं आहे.