मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार आहे, कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात ‘आलेच मी’ म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी अत्यंत जोशपूर्ण आणि सुरेख आहे.
या भूमिकेसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते, “’देवमाणूस’ मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल, अशी आशा आहे!”
‘आलेच मी’ हे गाणे त्याच्या भन्नाट बीट्स, आकर्षक सादरीकरण आणि सईच्या जबरदस्त उपस्थितीमुळे लवकरच टॉप लिस्टमध्ये झळकण्यास सज्ज आहे. लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित देवमाणूस २५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…