PBKS vs KKR, IPL 2025: घरच्या मैदानावर कोलकत्त्याविरुद्ध पंजाबचे 'बल्ले बल्ले', १६ धावांनी मिळवला विजय

मोहाली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३१व्या सामन्यात आज पंजाबच्या मैदानावर जबरदस्त सामना पाहायला मिळाला. खरंतर जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला आव्हान फारच छोटे होते. मात्र न भूतो न भविष्यती अशी कामगिरी पंजाब किंग्सने करून दाखवली. घरच्या मैदानावर पंजाब किंग्स संघाचा जलवा पाहायला मिळाला.


आज कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबने १६ धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने विजयासाठी केवळ ११२ धावांचे आव्हान कोलकत्ता नाईट रायडर्सला दिले होते. मात्र इतके छोटे आव्हानही कोलकत्त्याला पेलता आले नाही. त्यांचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले आणि संपूर्ण संघ अवघ्या ९५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.


या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पंजाबचा संघ संपूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. १६व्या षटकांतच १११ धावांवर त्यांचा डाव आटोपला. कोलकत्त्याकडून हर्षित राणाने ३ विकेट मिळवल्या तर वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.


एकूण धावसंख्या पाहता कोलकत्ता सहज हे आव्हान पार करेल असे वाटत होते. मात्र केकेआरचा संघ मैदानावर सुरूवातीपासूनच दबावात दिसला. चहलच्या फिरकीसमोर रहाणेच्या टीमचे काही चालले नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी कोलकाताला ११२ धावाही करू दिल्या नाहीत. कोलकत्त्याचा संघ १६व्या षटकांत ९५ धावांवरच तंबूत परतला. पंजाबकडून चहलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.


Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला