French Open: महिला दुहेरीत सिनियाकोव्हा-टाउनसेंड जोडीचे जेतेपदावर शिक्कामोर्तब !

Paris : फ्रेंच ओपन २०२६ मध्ये अव्वल मानांकित कॅटेरिना सिनियाकोव्हा आणि टेलर टाउनसेंड या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रविवारी (७ मे)झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी द्वितीय मानांकित ॲना डॅनिलिना आणि अलेक्झांड्रा क्रुनिक यांचा ६-२, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत इतिहास रचला आहे. पहिल्या सेटमध्ये सिनियाकोव्हा आणि टाउनसेंड जोडीने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये डॅनिलिना आणि क्रुनिक जोडीने चांगली झुंज दिली. चेक प्रजासत्ताकच्या सिनियाकोव्हाकडून काही चुका झाल्यामुळे ही जोडी सुरुवातीला पिछाडीवर होती, परंतु अमेरिकन खेळाडू टेलर टाउनसेंडने आपल्या अचूक विनर्सच्या जोरावर सामन्यात पुनरागमन केले. शेवटी सिनियाकोव्हाच्या शक्तिशाली सर्व्हिसमुळे या जोडीने तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आपल्या नावावर केले.



सिनियाकोव्हाची यशस्वी वेगवान प्रगती :


३० वर्षीय कॅटेरिना सिनियाकोव्हासाठी हे विजेतेपद विशेष ठरले आहे. तिने आतापर्यंत महिला दुहेरीमध्ये ११ ग्रँड स्लॅम पदके जिंकली असून, त्यापैकी ४ पदके रोलँड गॅरोस येथे मिळवली आहेत. पराभूत जोडी, डॅनिलिना आणि क्रुनिक यांच्यासाठी मात्र हा धक्का मोठा ठरला, कारण ऑस्ट्रेलियन ओपननंतर त्यांना सलग दुसऱ्या फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा