PBKS vs KKR, IPL 2025: घरच्या मैदानावर कोलकत्त्याविरुद्ध पंजाबचे 'बल्ले बल्ले', १६ धावांनी मिळवला विजय

  54

मोहाली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३१व्या सामन्यात आज पंजाबच्या मैदानावर जबरदस्त सामना पाहायला मिळाला. खरंतर जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला आव्हान फारच छोटे होते. मात्र न भूतो न भविष्यती अशी कामगिरी पंजाब किंग्सने करून दाखवली. घरच्या मैदानावर पंजाब किंग्स संघाचा जलवा पाहायला मिळाला.


आज कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबने १६ धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने विजयासाठी केवळ ११२ धावांचे आव्हान कोलकत्ता नाईट रायडर्सला दिले होते. मात्र इतके छोटे आव्हानही कोलकत्त्याला पेलता आले नाही. त्यांचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले आणि संपूर्ण संघ अवघ्या ९५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.


या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पंजाबचा संघ संपूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. १६व्या षटकांतच १११ धावांवर त्यांचा डाव आटोपला. कोलकत्त्याकडून हर्षित राणाने ३ विकेट मिळवल्या तर वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.


एकूण धावसंख्या पाहता कोलकत्ता सहज हे आव्हान पार करेल असे वाटत होते. मात्र केकेआरचा संघ मैदानावर सुरूवातीपासूनच दबावात दिसला. चहलच्या फिरकीसमोर रहाणेच्या टीमचे काही चालले नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी कोलकाताला ११२ धावाही करू दिल्या नाहीत. कोलकत्त्याचा संघ १६व्या षटकांत ९५ धावांवरच तंबूत परतला. पंजाबकडून चहलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.


Comments
Add Comment

India vs England: आजपासून भारत वि इंग्लंड कसोटीला सुरूवात, पाहा किती वाजता सुरू होईल सामना

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार २० जूनपासून सुरूवात होत आहे. या

IPL 2025: RCBच्या विजयी क्षणांनी रचला इतिहास

मुंबई: आयपीएल २०२५मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा खिताब जिंकत अनेक वर्षे जुने स्वप्न पूर्ण केले.

पहिल्या कसोटीपूर्वी करुण नायर दुखापतग्रस्त; भारतीय संघाची चिंता वाढली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्याआधी टीम इंडियासाठी

भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची कमाल, पहिल्या क्रमांकाच्या होउ यिफानला हरवले

नवी दिल्ली : लंडन येथे सुरू असलेल्या FIDE वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू

या तारखेला असणार भारत-पाकिस्तान यांच्यातील २०२६ टी-२० वर्ल्डकप सामना, पाहा वेळापत्रक

मुंबई: २०२६मध्ये होणाऱ्या टी-२० महिला वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंड करत आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने

भारताचा कसोटी कर्णधार न होण्याबाबत जसप्रीत बुमराहने सोडले मौन

लंडन:  जसप्रीत बुमराहने अखेर भारताच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल आपले मौन सोडले आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित