नवी दिल्ली : बलात्कार पीडितेबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१५) अलाहाबाद उच्च न्यायालयाला फटकारले. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वादग्रस्त टिप्पणी करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे .
१० एप्रिल रोजी एका प्रकरणात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ‘पीडित मुलीने स्वतःच संकटाला आमंत्रण दिले आहे, ती बलात्कारासाठी जबाबदार आहे.’ या टिप्पणीवर न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने आक्षेप घेतला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी ही टिप्पणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटले की, जामीन मंजूर करणे हा प्रत्येक प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून न्यायाधीशांचा विवेक असला तरी तक्रारदाराविरुद्ध असे अनावश्यक निरीक्षण टाळले पाहिजे. अशा टिप्पण्या करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. पूर्ण न्याय झाला पाहिजे आणि तो दिसलाही पाहिजे. सामान्य माणूस अशा आदेशांना कसा पाहतो हे देखील पाहिले पाहिजे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले. दरम्यान, २६ मार्च रोजीही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अशाच एका टिप्पणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…