
उन्हातून आल्यावर सगळ्यांनाच थंड पाणी पिण्याची सवय असते. पण तेच थंड पाणी तुमच्या शरीराला योग्य नाही. हल्ली रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस खुप वाढत आहे. तरीही लोक आरोग्याला एवढ्या गंभीरतेने पाहत नाहीत. आपल्याला जेवढी थंड पाण्याची गरज असते तेवढीच आपल्या शरीराला कोमट पाण्याची देखील गरज असते. थंड पाणी हे प्रमाणपेक्षा जास्त प्यायल्याने त्रास होऊ शकतो.
उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी प्यावे का?
सगळ्यांनाच थंड पाणी पिण्याची सवय असते. उन्हातून आलं कि सगळ्यांना थंड पाणी प्यावेसे वाटते. पण हे थंड पाणी जर प्रमाणपेक्षा जास्त प्यायलो तर शरीराला त्रास होऊ शकतो. त्याऐवजी उन्हातून आल्यावर साधारण पाणी प्यायलो तर त्रास होत नाही.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी! भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदा देशात मोसमी पाऊस ...
कोमट पाणी का प्यायला पाहिजे?
काही लोकांना कोमट पाणी पिण्याची सवय असते. सकाळी उपाशी पोटी जर कोमट पाणी प्यायलो तर ते खुप फायदेशीर असते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यायलो तर ते आरोग्याला फायदेशीर ठरू शकते
.
आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील कोमट पाणी फायदेशीर असते. तुम्ही पोट रिकामे असताना कोमट पाणी प्यायल्यास तुमचा तणाव आणि चिंता कमी होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी करणे, पेशींना आराम मिळणे, रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारणे असे फायदे होऊ शकतात. कोमट पाणी हे डोकेदुखी आणि मायग्रेन यासारख्या आजारांवर मात करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.