Alka Kubal : २७ वर्षानंतर अलका कुबल यांचा कमबॅक! रंगभूमीवर केली 'वजनदार' एन्ट्री

मुंबई : 'माहेरची साडी' या चित्रपटातून घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी चित्रपटसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिवशाही- मुद्रा भद्राय राजते, कंसा कंसा, मधुचंद्राची रात्र, नटसम्राट, संध्या छाया अशा अनेक नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या अलका कुबल याचा चाहतावर्ग मोठा आहे. दरम्यान मनोरंजनसृष्टीत (Entertainment) खणखणीत अभिनयाच ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) या तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत.



लठ्ठपणावर भाष्य करणारं 'अष्टविनायक' आणि 'विप्रा क्रिएशन्स' यांची प्रस्तुती असलेलं एक ‘वजनदार’ (Vajandar Marathi Natak) नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. विशेष म्हणजे या नाटकात त्यांची 'वजनदार' भूमिका सादर करणार आहेत. लठ्ठ असणं कुणालाच फारसं प्रिय नसतं. आपल्या लठ्ठपणाचा कॉम्प्लेक्स अनेकांना येत असतो. बारीक होण्याची धडपड. त्यासाठी चालणं, सायकलिंग, डाएटचे वेगवेगळे प्रकार, औषधं, जिम आणि बरंच काही... सुरु असतं. एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या अलकाजी या नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत. आपल्या कमबॅक विषयी बोलताना त्या सांगतात की, २७ वर्षांपूर्वी मी केलेल्या सुधीर भटांच्या 'साष्टांग नमस्कार' या नाटकानंतर पुन्हा रंगभूमीवर मला काम करायचे होते, ‘वजनदार’ या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची उत्सुकता आहेच. माझी भूमिका प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वासही अलका यांनी व्यक्त केला.


‘वजनदार’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत त्या म्हणाल्या की, जरी २७ वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात चित्रपट, मालिका करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. वजनदार माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.



वजनदार नाटक कधी पाहता येणार?


वेगवेगळ्या सकस नाट्यकृती नाट्यरसिकांसाठी आणणाऱ्या 'अष्टविनायक' संस्थेने विप्रा क्रिएशन्स' च्या साथीने आणलेल्या 'वजनदार' नाट्यकृतीचा शुभारंभ येत्या २४ एप्रिल रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे दुपारी ४ वाजता सादर होणार आहे.


मनोरंजनसृष्टीतल्या दोन नावाजलेल्या गुणी अभिनेत्री संपदा कुलकणी-जोगळेकर आणि अलका कुबल ‘वजनदार’ नाटकाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. संपदा कुळकर्णी-जोगळेकर लिखित आणि संतोष वेरूळकर दिग्दर्शित या नाटकात अभिनेत्री अलका कुबल मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. अलका कुबल यांच्यासह अभिषेक देशमुख, साक्षी पाटील,अभय जोशी, पूनम सरोदे आदि कलाकार यात आहेत.


दरम्यान, संध्या रोठे, प्रांजली मते, दिलीप जाधव यांनी 'वजनदार' या नाटकाची निर्मिती केली आहे. संगीत मंदार देशपांडे यांचे आहे. नेपथ्य सचिन गावकर तर प्रकाश योजना अमोघ फडके यांची आहे. वेशभूषा हर्षदा बोरकर तर रंगभूषा कमलेश बिचे यांची आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट