
पानथळ पक्षी पाहण्याची जिल्ह्यातील पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
ठाणे (प्रशांत सिनकर) : ठाण्यात खाडी परिसरात अतिक्रमण करून जैवविविधा नष्ट होत असताना ठाणे पूर्व परिसरात खाडी भाग मोकळा श्वास घेतो आहे. या ठिकाणी विविध पक्ष्यांची मांदियाळी बघायला मिळत असून, हजारो किलोमीटर अंतर पार करून आलेल्या ठिपक्यांचा टिलवा पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.

मुंबई: जिओच्या अनेक रिचार्ज प्लानबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल मात्र तुम्हाला १९९ रूपयांच्या जिओच्या प्लानबद्दल माहिती आहे का? जिओच्या ...
ठाणे शहराला २७ किमीचा खाडी किनारा लाभला असून, कांदळवन आणि खाडीच्या पाणथळ जागेत जैव विविधता मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे. मात्र खाडीतील अतिक्रमण प्राणी पक्ष्यांसाठी धोक्याची घंटा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने एका बाजूला ऱ्हास होत आहे. परंतु ठाणे पूर्व भागात पर्यावरणासाठी सुखद घटना घडली आहे.शढ दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतराच्या ऋतूमध्ये विविध परदेशी पाहुणे आपला मुक्काम (Bird Migration) खाडी भागात करतात. यंदाचा विशेष पाहुणा म्हणजे हा ठिपक्यांचा टिलवा हा पाणथळ पक्षी मिठागर परिसरात बघायला मिळत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी दिली.
आकर्षक रूप, सौंदर्याची झलक
तित्तिरा एवढा हा पक्षी दिसायला अगदी उठून दिसतो. हिवाळ्यात त्याचा पिसारा राखसर व फिकट असतो. मात्र उन्हाळा आणि प्रजनन हंगाम सुरु होताच त्याचे रंग पालटतात. काळसर पिसाऱ्यावर उठून दिसणारे पांढरे ठिपके याला विशेष आकर्षक बनवतात. यामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलते.
पर्यावरण संवर्धनाची खूण
या स्थलांतरित पाहुण्याच्या उपस्थितीने ठाण्यातील मिठागर परिसरातील पर्यावरणीय संतुलन आणि जैवविविधतेचे महत्व अधोरेखित झाले आहे. स्थानिक प्रशासन व पर्यावरण कार्यकर्त्यांनी या पक्ष्यांसाठी शांतता राखण्याचे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
आहार आणि वावर
त्याची लांब व किंचित वाकडी चोच डोक्याजवळ लालसर आणि टोकाला काळसर असते. पायही काळसर-तांबडे रंगाचे असतात. तो पाण्यात चोच घालून छोटे मासे, जलचर किडे, शंख-शिंपले शोधत राहतो. हा पक्षी सहसा एकटाच किंवा छोट्या गटात दिसतो. पाणथळ जागा, खाडी किनारे, आणि गोड्या पाण्याचे साठे याच्या वावराचे आवडते ठिकाण असतात.- वीरेंद्र घरत (पक्षी अभ्यासक ठाणे)