मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला उद्देशून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आली आहे. तसेच सलमानच्या घुसून त्याला बॉम्बने उडवू असंही त्यात म्हटलंय. धमकी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Railway News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणार ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबर सार्वजनिक आहे. या नंबरवर कोणीही तक्रार करू शकते. अनेकदा या नंबरवर स्वतःची ओळख लपवून तक्रारी पाठवल्या जातात. पोलीस सर्व तक्रारींची दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करतात. यामुळे सलमानला धमकी देणारा संदेश व्हॉट्सॲपवर येताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सलमानला संरक्षण पुरवणाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगरम्यान सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप झाला. या प्रकरणापासूनच तो बिष्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. काळवीट हा बिष्नोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं. या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली होती. शिवाय बुलेटप्रूफ कार खरेदी केली आणि वापरायला सुरुवात केली.