Friday, April 18, 2025
HomeदेशPNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

PNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

नवी दिल्ली : पंजाब अँड नॅशनल बँक अर्थात पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरुन चोकसीला अटक करण्यात आली आहे.

चोक्सीला उपचारासाठी बेल्जियमला आणण्यात आले होते. बेल्जियम पोलिसांनी ११ एप्रिलला मेहुल चोक्सीला अटक केली. अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आग्रहानंतर ही अटक झाली आहे.

बेल्जियम पोलिसांनी मुंबईच्या न्यायालयाच्या वॉरंटचा दिला हवाला

बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक करताना मुंबईच्या कोर्टाने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. रिपोर्टमध्ये म्हटले की हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१मध्ये जारी करण्यात आले होते. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, मेहुल चोक्सी खराब आरोग्य आणि इतर कारणांचा हवाला देत जामीन आणि तत्काळ सुटकेची मागणी करू शकतो.

भारतातून कधी पळाला होता मेहुल चोक्सी?

पीएनबीचे १३ हजार ४०० कोटी रुपये बुडवून मेहुल चोक्सीने आपला भाचा नीरव मोदीसह जानेवारी २०१८मध्ये भारतातून पलायन केले होते. पंजाब नॅशनल बँकेमध्ये फसवणुकीचे प्रकरण उघडकीस येण्याआधीच दोघांनी देश सोडला होता. हा भारतातील दुसरा सर्वात मोठा बँक घोटाळा होता. हे प्रकरण समोर येण्याआधीच चोक्सीने अँटिंग्वाचे नागरिकत्व घेतले होते.२०२१मध्ये जेव्हा तो क्युबा येथे जात होता तेव्हा डोमिनिकामध्ये त्याला पकडण्यात आले होते. यानंतर मेहुलने म्हटले होते की राजकीय कारणामुळे त्याच्यावर ही प्रकरणे सुरू आहेत.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -