मुंबईतील मिठी नदी, नाले ५० दिवसांत गाळमुक्त होणार

कामात त्रिसूत्री वापरण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे, अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा. त्याचबरोबर पावसाळ्यातही विविध प्राधिकरणांशी संपर्कात राहावे, अशा सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, २५ मार्चपासून नालेसफाई सुरू झाली असून, आतापर्यंत १२ टक्के गाळ काढण्यात आला आहे.


मुंबईत पावसाळापूर्व कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. प्रत्येक अभियंत्याच्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती त्यांना असायलाच हवी, असे आयुक्तांनी नमूद केले.


कामाची सद्यस्थिती, तेथील आकाने, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर आताच तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, या कामात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवा. प्रत्येक अभियंत्याने कामांचा टप्पा, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि हातातील कालावधी त्याचबरोबर पंप पुरवणाऱ्या कंत्राटदारांवर देखील कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला. तसेच त्रिसूत्रीचा वापर करून पुढील कामांचे नियोजन करावे, अशा सूचना पालिका आयुक्तांनी मा बैठकीअंतर्गत दिल्या.



'मोबाइल पंप सज्ज ठेवा'


सखल भागामध्ये पाणी उपशासाठी पालिका पंप बसविणार आहे. हे पंप पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक पंपासाठी सूक्ष्म नियोजन करून तेथे पालिकेचा कर्मचारी तैनात कराया, काही मोबाइल पंग सज्ज ठेवावेत. एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यास तेथे नोबाइल पंपाद्वारे पाणी उपसा करावा, पंपामध्ये सातत्याने विघाड झाला, तर इहन्मुंबई महानगरपालिका पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. यंदाच्या पावसाळ्यात जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, हवामान विभागातर्फे जेव्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात येईल, अशावेळी प्रत्येक अधिकाऱ्याने कार्यस्थळी हजर राहावे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय

Navnath Ban : "हे ऐतिहासिक पर्व नाही, तर पराभवाची नांदी!"; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती हल्ला, मुंबई लुटणाऱ्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या संभाव्य युतीवर राजकीय