मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League 2025) अर्थात आयपीएलच्या (IPL) यंदाच्या हंगामात आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. या २७ सामन्यांनंतर गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स हा संघ आघाडीवर दिसत आहे. दिल्लीने आतापर्यंत चार साखळी सामने खेळून ते सर्व जिंकले आहेत. यामुळे दिल्ली कॅपिटल्स आठ गुण आणि १.२७८ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे.
गुजरात टायटन्सने आतापर्यंत सहा साखळे खेळले आहेत. यातील चार सामने जिंकले आणि दोन सामन्यांत त्यांचा पराभव झाला. यामुळे गुजरात आठ गुण आणि १.०८१ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत खेळलेल्या सहा साखळी सामन्यांपैकी चार जिंकले आणि दोन हरले आहेत. ते आठ गुण आणि ०.१६२ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स आतापर्यंत खेळलेल्या सहा साखळी सामन्यांपैकी तीन जिंकले आणि तीन हरले आहेत. यामुळे कोलकाता सहा गुण आणि ०.८०३ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी तीन सामन्यांत विजयी झाला आहे आणि दोन सामन्यांत हरला आहे. यामुळे कोलकाता सहा गुण आणि ०.५३९ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी तीन सामन्यांत विजयी झाला आहे आणि दोन सामन्यांत हरला आहे. यामुळे ते सहा गुण आणि ०.०६५ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर आहेत.
राजस्थान रॉयल्स आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी दोन साखळी सामन्यांत विजयी झाला आणि तीन सामन्यांत हरला. यामुळे राजस्थानचा संघ चार गुण आणि -०.७३३ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी फक्त दोन सामन्यांत जिंकला आणि चार सामन्यांत हरला आहे. यामुळे हैदराबादचा संघ चार गुण आणि -१.२४५ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात आठव्या स्थानावर आहे.
आयपीएलचे राजे संघ गुणतक्त्याच्या तळाशी आहेत. चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. पण आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स नवव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी फक्त एकाच साखळी सामन्यात विजयी झाल्यामुळे दोन गुण -०.०१० च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात नवव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपरकिंग्स यंदाच्या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी फक्त एकाच साखळी सामन्यात विजयी झाल्यामुळे दोन गुण आणि -१.५५४ च्या नेट रनरेटसह (धावगती) गुणतक्त्यात दहाव्या स्थानावर आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये ७० साखळी सामने होणार आहेत. साखळी सामन्यांची फेरी १८ मे पर्यंत चालणार आहे. आतापर्यंत फक्त २७ साखळी सामने झाले आहेत. यामुळे प्रत्येक संघांला कामगिरी सुधारण्यासाठी पुरेशी संधी मिळणार आहे.