Mumbai water crisis : ऐन उन्हाळ्यात टँकर संघटनेचा संप, मुंबईकर चिंतेत

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने (Mumbai Water Tanker Association or MWTA) संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भरमसाठ भूजल उपसा टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनला काही अटी घातल्या आहेत. या अटींच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे.



भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असेल तरच त्याचा वापर पाणी घेण्यासाठी करता येईल, अशी अट मुंबई महापालिकेने टँकरवाल्यांसाठी लागू केली आहे. या अटीला मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध आहे. मुंबईत ही अट कशी मान्य करायची आणि एवढा मोठा भूखंड कुठून आणायचा ? असा प्रश्न मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात जिथे पाणी टंचाई आहे तिथल्या नागरिकांच्या सोयीसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याकरिता टँकरना भूजलस्रोतातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा हा करावा लागतो. महापालिकेच्या अटीचे पालन करायचे ठरवले तर मुंबईकरांसाठी शहराबाहेरुन पाणी आणावे लागेल. हे करणे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. यामुळे मुंबई महापालिकेने भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असावा ही अट मागे घेण्याची मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे.





सध्या एप्रिल महिना सुरू आहे. आताच मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अजून पूर्ण मे महिना बाकी आहे. यानंर जून उजाडणार आहे. यामुळे पाण्याच्या टँकरवर कडक निर्बंध नको. एकावेळी जास्तीत जास्त पाणी भूजलस्रोतातून उपसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी टँकरच चालक - मालक करत आहेत. मागणी अमान्य झाली अथवा दीर्घ काळ रेंगाळली तर बेमुदत संप करू, जून महिन्यात अनेकदा मुंबईकरांना काही दिवस तीव्र पाणीटंचाई जाणवते. या काळात संप सुरू असेल मुंबईकरांचे हाल होतील. हा त्रास टाळण्यासाठी लवकर तोडगा काढावा अशी मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे. मुंबईतील टँकर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे बाजू मांडू, यातून तोडगा निघेल, असा विश्वास मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,