

कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात २३ डिसेंबर २०२४ रोजी खाऊ आणायला गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. ...
भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असेल तरच त्याचा वापर पाणी घेण्यासाठी करता येईल, अशी अट मुंबई महापालिकेने टँकरवाल्यांसाठी लागू केली आहे. या अटीला मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध आहे. मुंबईत ही अट कशी मान्य करायची आणि एवढा मोठा भूखंड कुठून आणायचा ? असा प्रश्न मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात जिथे पाणी टंचाई आहे तिथल्या नागरिकांच्या सोयीसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याकरिता टँकरना भूजलस्रोतातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा हा करावा लागतो. महापालिकेच्या अटीचे पालन करायचे ठरवले तर मुंबईकरांसाठी शहराबाहेरुन पाणी आणावे लागेल. हे करणे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. यामुळे मुंबई महापालिकेने भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असावा ही अट मागे घेण्याची मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League 2025) अर्थात आयपीएलच्या (IPL) यंदाच्या हंगामात आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. या २७ सामन्यांनंतर गुणतक्त्यात दिल्ली ...

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीचे निमित्त साधून त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. आताच मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अजून पूर्ण मे महिना बाकी आहे. यानंर जून उजाडणार आहे. यामुळे पाण्याच्या टँकरवर कडक निर्बंध नको. एकावेळी जास्तीत जास्त पाणी भूजलस्रोतातून उपसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी टँकरच चालक - मालक करत आहेत. मागणी अमान्य झाली अथवा दीर्घ काळ रेंगाळली तर बेमुदत संप करू, जून महिन्यात अनेकदा मुंबईकरांना काही दिवस तीव्र पाणीटंचाई जाणवते. या काळात संप सुरू असेल मुंबईकरांचे हाल होतील. हा त्रास टाळण्यासाठी लवकर तोडगा काढावा अशी मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे. मुंबईतील टँकर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे बाजू मांडू, यातून तोडगा निघेल, असा विश्वास मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने व्यक्त केला आहे.