Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीDr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टूर सर्कीट

Dr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टूर सर्कीट

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीचे निमित्त साधून त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा सहलीत समावेश करण्यात आला आहे. या सहलीचे १४ आणि १५ एप्रिल रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे आयोजन करण्यात येणार आहे.

Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्याने विशालने कारागृहात केली आत्महत्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील दादर येथे असलेली चैत्यभूमी, राजगृह, प्रिंटिंग प्रेस, परळ येथील बीआयटी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच नाशिकमधील येवले मुक्तिभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या ठिकाणांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नागपूर येथील दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा टूर सर्कीटमध्ये समावेश आहे. टूर सर्किटद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लोकांना देणे आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची संधी मिळवून देणे हाच उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेसाठीचे काम शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि संविधाननिर्मितीतील त्यांचे योगदान यांचे महत्त्व सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.

IPL 2025 : आयपीएल गुणतक्त्यात कोणता संघ कोणत्या स्थानी ?

टूर सर्किट म्हणजे सामाजिक समता आणि ज्ञानप्रसाराचे प्रतीक आहे. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. या टूर सर्किटद्वारे त्यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांना भेट देऊन पर्यटकांना त्यांचा समृद्ध वारसा समजण्याची संधी मिळेल, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

टूर सर्किट
ठिकाणे : मुंबई, नाशिक आणि नागपूर
कालावधी : १४-१५ एप्रिल
सुविधा : प्रत्येक शहरात दररोज दोन बसद्वारे सहल, टूर गाइड, अल्पोपहार, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे वितरण
संपर्क : मुंबई ९९६९९७६९६६ । नाशिक ९६०७५२७७६३ / ९६५७०२१४५६ । नागपूर ९७६४४८१९१३/ ७२१८७८३५१५

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -