Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBhushan Gavai : नागपूरचे भूषण गवई होणार सरन्यायाधीश

Bhushan Gavai : नागपूरचे भूषण गवई होणार सरन्यायाधीश

नागपूर : सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. नागपूरचे भूषण गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहे. ते मूळचे नागपूरकर आहेत. भूषण गवई हे विद्यमान सरन्यायाधीशांच्या नंतरचे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.

Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्याने विशालने कारागृहात केली आत्महत्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या दिवशीच भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. या निमित्ताने न्यायमूर्ती एम. हिदायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचा आणखी एक सदस्य सरन्यायाधीश होणार आहे.

IPL 2025 : आयपीएल गुणतक्त्यात कोणता संघ कोणत्या स्थानी ?

संजीव खन्ना यांच्या आधी सरन्यायाधीश पद भूषवणारे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सुद्धा महाराष्ट्राचेच होते.

कारकिर्द

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला.

वकिलीला सुरुवात १६ मार्च १९८५ रोजी केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता आणि माजी न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत १९८७ पर्यंत काम केले.

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात १९८७ ते १९९० या काळात स्वतंत्रपणे वकिली केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १९९० जास्त वकिली केली.

न्यायमूर्ती भूषण गवई हे नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.

भूषण गवई ऑगस्ट १९९२ ते १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती.

नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून १७ जानेवारी २००० मध्ये भूषण गवई यांची नियुक्ती

उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची १४ नोव्हेंबर २००३ मध्ये बढती

भूषण गवई यांची १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची २४ मे २०१९ रोजी नियुक्ती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -