DC vs MI, IPL 2025: मुंबईला विजयाचा सूर गवसला, दिल्लीला १२ धावांनी हरवले

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या २९व्या सामन्यात अखेर मुंबईला विजयी सूर गवसला आहे. सलग ४ सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर दिल्लीविरुद्ध दिल्लीच्याच मैदानात विजय मिळवण्यास मुंबईला यश मिळाले आहे. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईने दिल्लीला १२ धावांनी हरवत आपल्या पराभवाची मालिका खंडित केली आहे.


तिलक वर्माच्या धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या होत्या. तिलक वर्माने जबरदस्त खेळ करताना ३३ बॉलमध्ये ५९ धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले.


त्याआधी सलामीसाठी आलेला रोहित शर्मा पुन्हा अयशस्वी ठरला. त्याने १८ धावा केल्या. रियान रिकल्टनने २५ बॉलमध्ये ४१ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने यादवने फटकेबाजी करताना २८ बॉलमध्ये ४० धावा तडकावल्या. नमन धीरने नाबाद ३८ धावा केल्या. शेवटच्या बॉलवर विल जॅक्स आणि नमन धीर यांनी धावून ४ धावा काढल्या. दिल्लीकडून विप्रज निगम आणि कुलदीप यादवने २ धावा ठोकल्या.


मुंबईने दिलेले हे आव्हान खरंतर दिल्लीसाठी मोठे नव्हते. दिल्लीच्या करूण नायरने ४० बॉलमध्ये ८९ धावांची दमदार खेळी केली. मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे विकेट पटापट गेले आणि दिल्लीचा पराभव झाला. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे ३ विकेट झटपट पडले.
Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या