Thane News : कांदळवन बफरझोन क्षेत्रामध्ये अवैधरीत्या वृक्षतोड केल्याप्रकरणी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे :  सिडकोच्या मालकीची नेरूळ, सीवूड्स प्लॉट नं. ३, ६, ७ सेक्टर 52ए येथील जागा भूखंड वाटपाद्वारे मेयर्स टूडे रॉयल डेव्हलपर्स यांना देण्यात आली होती. या जागी त्यांच्यामार्फत जेसीबीच्या सहाय्याने विविध प्रकारची १०० झाडे मुळासकट तोडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच ही झाडे तोडण्याकरिता सिडकोकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.




या भूखंडावर अनधिकृतपणे झालेल्या वृक्षतोडी विरोधात नवी मुंबई महापालिकेमार्फत येथे जाऊन दोन जेसीबी ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानुषंगाने या जमिनीवरील कांदळवन बफरझोन क्षेत्रामध्ये अवैधरीत्या वृक्षतोड केल्याप्रकरणी संबंधित विकासक/ठेकेदार यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम १५ (१) अन्वये एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी उर्मिला पाटील व तहसिलदार उमेश पाटील यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२

जयपूर-अजमेर महामार्गावर २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट

केमिकल टँकर आणि लीपीजी ट्रकमध्ये धडक, एकाचा मृत्यू जयपूर (वृत्तसंस्था) : मंगळवारी रात्री १० वाजता जयपूर-अजमेर