मुंबई : आधी यूपीआय बंद पडल्यामुळे अनेक ऑनलाईन आर्थिक व्यवहार अडचणीत सापडले होते. ती परिस्थिती सावरली तर व्हॉट्सएप बंद पडले. मेसेज जाणे – येणे, स्टेटस अपलोड होणे हे सगळे ठप्प झाले होते. यामुळे अनेकांना व्हॉट्सएपद्वारे संवाद साधणे कठीण झाले होते.
व्हॉट्सएप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे, वेगवान आणि लोकप्रिय असे मेसेजिंग अॅप आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे व्हॉट्सएप ठप्प झाले. मेसेज जाणे – येणे, स्टेटस अपलोड होणे हे सगळे बंद झाले. व्हॉट्सएपद्वारे संवाद साधणे कठीण झाले. यूपीआय बंद पडल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर होत नाहीत तोच व्हॉट्सएप बंद पडले. यामुळे इंटनेट वापरणारे हैराण झाले. अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याच विषयाची चर्चा करू लागले. या निमित्ताने व्हॉट्सएपवरुन वेगवेगळे मीम्स आणि जोक्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली.