Tuesday, April 29, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसाप्ताहिकअर्थविश्व

UPI Down : यूपीआय ठप्प; गूगल पे, फोन पे आणि पेटीएम बंद

UPI Down : यूपीआय ठप्प; गूगल पे, फोन पे आणि पेटीएम बंद मुंबई : युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय ठप्प झाले आहे. यामुळे थेट बँक खात्यामार्फत होणारे आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. गूगल पे, फोन पे आणि पेटीएम यांच्यासह अनेक अॅपचा यूपीआय प्लॅटफॉर्म बंद पडला आहे. यामुळे मोबाईलद्वारे झटपट आर्थिक व्यवहार करण्याची सवय झालेल्यांची पंचाईत झाली आहे. दुपारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरुन एक्स पोस्ट करुन यूपीआय ठप्प असल्याचे जाहीर केले. यूपीआय ठप्प झाल्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे हाल होत आहेत. सर्व ऑनलाईन आर्थिक व्यवहार बंद आहेत. दुपारपासून देशभरातून मोठ्या संख्येने तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार खोळंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञ परिस्थिती सुरळीत करण्यात गुंतले आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी थोड्या वेळासाठी यूपीआय ठप्प झाले होते. अवघ्या काही दिवसांत दोन वेळा यूपीआय ठप्प झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment