Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मुंबई लोकल नाशिकपर्यंत लवकरच धावणार

मुंबई लोकल नाशिकपर्यंत लवकरच धावणार
मुंबई - मुंबई ते नाशिक दरम्यान हजारो प्रवासी नियमित प्रवास करतात. या प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेससारख्या काही गाड्या आहेत. मात्र नाशिकपर्यंत थेट लोकल सुरू होण्यासाठी कसारा घाटाची अडचण होती. आता ही अडचण दूर होणार असल्याने मुंबई ते नाशिक लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याने मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे.



नवीन रेल्वे लाईनमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच नाशिक आणि मुंबई ही दोन शहरे लोकल सेवेने जोडली जाणार आहेत. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याने मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे.



नाशिक ते मुंबई दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या रेल्वे लाईनमुळे बोगद्यांचा डायमीटर वाढवला जाईल. त्यामुळे वेगाने प्रवास होणार आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.
Comments
Add Comment