Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRailway Mega Block : रेल्वेचा २ दिवस जम्बो मेगाब्लॉक, ३४४ लोकल सेवा...

Railway Mega Block : रेल्वेचा २ दिवस जम्बो मेगाब्लॉक, ३४४ लोकल सेवा रद्द

मुंबई : पश्चिम रेल्वेने २ दिवस जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ३४४ लोकल सेवा रद्द झाल्या. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बसला आहे. शुक्रवारच्या रात्रीपासून सुरु झालेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना रात्र स्टेशनवर काढावी लागली. तसेच सकाळी रेल्वे स्थानकावर आलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. मेगा ब्लॉकमुळे अंधेरी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली.

मेगा ब्लॉक घेण्याचं कारण?

पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) हे २ दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. माहिम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे शुक्रवार (११ एप्रिल) अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:०० ते सकाळी ८:३० पर्यंत गाड्या धावल्या नाहीत. अप डाऊन जलद मार्गावर रात्री १२:३० ते सकाळी ६:३० पर्यंत लोकल सेवा बंद होती. यावेळी चर्चगेट स्थानकातून रात्री १०:२३ सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

जिल्ह्याची उत्पादन क्षमता वाढवा, दरडोई उत्पन्न वाढीसाठी साथ द्या

शनिवारी (१२ एप्रिल) रोजी रेल्वेचा मेगा ब्लॉक होता. अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत लोकल सेवा बंद होती. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयांमध्ये पोहचणे अवघड झाले. अप जलद मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ८:०० वाजपर्यंत लोकल सेवा बंद होती. या काळात चर्चगेट दादर दरम्यान जलद लोकल बंद होत्या. तसेच डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच धावणार आहेत.

विरारवरुन फक्त अंधेरीपर्यंत लोकल

सकाळच्या वेळेत विरारवरुन सर्वच लोकल अंधेरीपर्यंत सोडण्यात आल्या. अंधेरीच्या पुढे मेगाब्लॉक सुरू असल्याने सर्व लोकल बंद होत्या. या मेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका बसला. अनेक प्रवाशांना रात्री दादर स्थानकावर झोपून काढावी लागली. रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणतीही सुविधा दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत होता. रात्री आलेल्या प्रवाशांना जेवण मिळाले नसल्याने प्लॅटफॉर्मवर उपाशीच झोपावे लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आपण मराठी भाषा परफेक्ट टाईप करणेचीअत्यंत गरज आहे आपला मराठी पेपर आहे याचे भान असू द्या.

Leave a Reply to गौतम एकनाथ शेरे 9619536159 Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -