Tuesday, April 29, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

फॅक्ट चेक : रेल्वेच्या तत्काळ तिकीट नियमांत खरंच बदल झालाय का?

फॅक्ट चेक : रेल्वेच्या तत्काळ तिकीट नियमांत खरंच बदल झालाय का?

नवी दिल्ली : १५ एप्रिल २०२५ पासून रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत का?


काय आहे व्हायरल मेसेजचा दावा?

  • एसी क्लाससाठी तात्काळ बुकिंग सकाळी १० ऐवजी ११ वाजता सुरू होईल.

  • नॉन-एसी बुकिंग ११ ते १२ दरम्यान होईल.

  • प्रीमियम तात्काळ बुकिंग १०:३० वाजता सुरू होईल.

  • सकाळी १० ते १२ या वेळेत एजंट बुकिंगवर बंदी घालण्यात आली आहे.


आयआरसीटीसीचं अधिकृत स्पष्टीकरण काय आहे?

११ एप्रिल २०२५ रोजी, IRCTC ने त्यांच्या अधिकृत @IRCTCofficial X (पूर्वी ट्विटर) हँडलवरून याबाबत स्पष्टीकरण देत, हे सर्व दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • तत्काळ बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.

  • एजंट बुकिंगच्या वेळेतही कोणतेही बदल झालेले नाहीत.


तात्काळ तिकीट बुकिंगची सध्याची वेळ (जैसे थे):

  • एसी क्लास (2A/3A/CC/EC/3E): सकाळी १०:०० वाजता, प्रवासाच्या एक दिवस आधी

  • नॉन-एसी क्लास (SL/FC/2S): सकाळी ११:०० वाजता, प्रवासाच्या एक दिवस आधी


फॅक्ट चेक निष्कर्ष:

व्हायरल होणारा मेसेज फेक आहे. IRCTC किंवा रेल्वेने तत्काळ तिकिट नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा.

Comments
Add Comment