Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDress Code : पुण्यात अष्टविनायकातील गणपतीसह पाच मंदिरात ड्रेसकोड

Dress Code : पुण्यात अष्टविनायकातील गणपतीसह पाच मंदिरात ड्रेसकोड

पुणे : पुणे जिल्ह्यात अष्टविनायकातील चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येणाऱ्या एकूण पाच मंदिरांमध्ये ड्रेसकोड अर्थात वस्त्रसंहिता लागू झाली आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, चिंचवडचा मोरया गोसावी संजीवनी मंदिर, खार नारंगी मंदिर या पाच मंदिरांमध्ये ड्रेसकोड अर्थात वस्त्रसंहिता लागू केल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केले.

“संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते अधा, संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे”, असं आवाहन प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis : ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…’

“आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी, चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे योग्य पोशाख परिधान करावा”, असेही चिंचवड देवस्थान ट्रस्टने या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

UPI Down : यूपीआय ठप्प; गूगल पे, फोन पे आणि पेटीएम बंद

“पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा. महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे. कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये”, असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -