मुंबई : मोबाईल ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिमधारकांसाठी कोट्यवधी युजर्स असलेल्या तिन्ही कंपन्या आपल्या युजर्ससाठी नवनवीन ऑफर्स, प्लान्स लॉन्च केले आहेत .
एअरटेलचा ४०९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या या प्लानची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एक्सट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि फ्री हॅलोट्यून्ससारखे बेनेफिट्स मिळतील.
CSK vs KKR, IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाइट राइडर्स आमने सामने
एअरटेलचा ४२९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या या प्लानची व्हॅलिडिटी एका महिन्याची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आण दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5Gडेटा, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एक्सट्रीम अँपचा अँक्सेस, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री हॅलोट्यून्स यासारखे बेनेफिट्स मिळतील .
जिओचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
हा प्लान २८ दिवसांची व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडसारखे बेनेफिट्स मिळतात.
वोडाफोन आयडियाचा ४०९ रुपयांचा प्लान
या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा (केवळ मुंबईसाठी), हाफ डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटसारखे बेनेफिट्स मिळतील.
वोडाफोन आयडियाचा ४६९ रुपयांचा प्लान
या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा (केवळ मुंबईसाठी), हाफ डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटसारखे बेनेफिट्स मिळतील. तसेच ३ महिन्यांसाठी JioHotstar (Mobile) सब्कक्रिप्शन मिळतील.