चेपॉक: चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईला ८ विकेटनी हरवले. चेन्नईने कोलकत्त्यासमोर विजयासाठी १०४ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. कोलकत्त्याने हे आव्हान केवळ १० षटके तसेच ८ विकेट राखत पूर्ण केले.
सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र कोलकत्त्याच्या गोलंदाजांसमोर चेन्नईने साफ गुडघे टेकले. चेन्नईने टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. कोलकात्ताच्या जबरदस्त माऱ्यासमोर चेन्नईला केवळ १०३ धावाच करता आल्या. आयपीएलच्या इतिहासातील चेन्नईचीही चेपॉकच्या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या आहे.
कोलकत्ताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करताना चेन्नईच्या खेळाडूंना खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. रचिन रवींद्रने ४, राहुल त्रिपाठीने १६, डेवॉन कॉन्वेने १२, विजय शंकरने २९ धावा करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाज साफ अपयशी ठरले. आर. अश्विन १, रवींद्र जडेजा ०, एमएस धोनी १, नूर अहमद १ अशा धावा केल्या.
कोलकत्त्याकडून सुनील नरेनने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर सलामीवीर क्विंटन डी कॉकने २३ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे २० वर तर रिंकू सिंह १५ धावांवर नाबाद राहिले.
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…
ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे काम पूर्ण मुंबई : ठाणे खाडी पूल ३…