मुंबई : चविष्ट अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या बर्गर किंग ‘इंडिया’ने आपल्या ग्राहकांसाठी आता कोरियन अन्न पदार्थांची मेजवानी उपलब्ध केली आहे. वेगवेगळ्या चवींसाठी आसुसलेल्या खाद्यप्रेमींना अस्सल कोरियन चव आणि झणझणीतपणाचा अनुभव देण्यासाठी बर्गर किंग इंडियाने ‘कोरियन स्पायसी फेस्ट’ सुरु केला आहे. यात खवय्यांना अस्सल कोरियन अन्नपदार्थांची चव चाखता येईल. हा मेन्यू मर्यादित वेळेत उपलब्ध असेल.
बर्गर किंग इंडियाच्या भारतातील सर्व शाखांमध्ये २ एप्रिल पासून ग्राहकांना ‘कोरियन स्पायसी फेस्ट’ची लज्जतदार चव अनुभवायला मिळत आहे. कोरियन खाद्यपदार्थांची क्रेझ असलेले जेन’झी’, मिलेनियम आणि तिखटप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही कोरियन खाद्यपदार्थांचे चाहते असाल किंवा तुम्हाला खाद्यपदार्थांमध्ये नाविन्यता हवी असेल तर बर्गर किंग इंडियाच्या कोणत्याही शाखेला भेट द्या आणि ‘कोरियन स्पायसी फेस्ट’चा अनुभव घ्या. कोरियन अन्नपदार्थांचा हा मेनू तुमच्यासाठी अगदी परिपूर्ण आहे. कोरियन अन्नपदार्थांची वाढती लोकप्रियता लक्षात घेत बर्गर किंगने अस्सल कोरियन अन्नपदार्थांचा मेनू तयार केला आहे.
कोरियन पदार्थांमध्ये विशेषतः तिळ, आले, लसूण आणि लाल मिरच्यांचा वापर होतो, जे पदार्थांना एक खास चव देतात. कोरियन पाककृती बनवताना या घटकांचा खास वापर करण्यात आला आहे. कोरियन अन्नपदार्थाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ब्रीओश बन. मऊ आणि थोडासा गोडसर स्वाद असलेले ब्रीओश बन कोरियन पाककृतीत तिखट आणि मसालेदार घटकांशी चांगले जुळून येतात. त्यामुळे ग्राहकांना एक वेगळी, समृद्ध आणि संतुलित चव अनुभवता येते.
New York Helicoptor Crash : न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू
बर्गर किंग इंडियाचे चीफ मार्केटिंग अॅण्ड डिजिटल अधिकारी कपिल ग्रोव्हर यांनी आपल्या रेस्टोरंटमध्ये सुरु झालेल्या या नव्या कोरियन खाद्य संस्कृतीचा परिचय करून देताना सांगितले की, “ अस्सल खवय्ये नवनवीन खाद्यपदार्थांच्या शोधात असतात. आज-काल कोरियन अन्नपदार्थांची लोकप्रियता वाढत असल्याचे आमच्या संशोधनात आढळले. बर्गर किंगमध्ये खव्वयांना कोरियन खाद्यपदार्थांची चव चाखता यावी आमच्या उत्पादन विकास टीमने अस्सल कोरियन खाद्यपदार्थांचा मेनू तयार केला. यात खास डंकिंग प्रोसेसचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकांना कोरियन खाद्य पदार्थांची एक वेगळीच चव अनुभवायला मिळेल. कोरियन स्पायसी फेस्टमुळे बर्गर किंग आपल्या ग्राहकांना एक अनोखा, खवखवीत आणि जागतिक दर्जाचा अनुभव देत आहे. प्रीमियम घटक, ब्रिओश बन, आणि विविध बर्गर आणि स्नॅक्स यांचं हे कॉम्बिनेशन आमच्या ग्राहकांचा आवडता मेनू ठरेल ही मला खात्री आहे. “
कोरियन स्पायसी फेस्टमध्ये खालीलप्रमाणे मेनू उपलब्ध असतील –
कोरियन स्पायसी चिकन बर्गर – झणझणीत कोरियन चवांमध्ये मुरलेलं कुरकुरीत चिकन, याचसोबत ताजे लेट्यूस आणि प्रीमियम ब्रिओश बनची चव चाखता येईल.
कोरियन स्पायसी पनीर बर्गर – पनीरप्रेमींसाठी खास कोरियन टच असलेला झणझणीत बर्गर मिळेल.
कोरियन स्पायसी चिकन विंग्स – रसाळ चिकन विंग्स हे खास कोरियन ग्लेझमध्ये बनवले जातात. या विंग्समध्ये गोडसर, तिखट आणि थोडीशी झणझणीत चव असते.
कोरियन स्पायसी चिकन बाईट्स – हा मांसाहारी पदार्थ खास झणझणीत आणि कुरकुरीत चवीसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक चिकनचा तुकडा विशेष मसाल्यांच्या मिश्रणात मॅरिनेट करून कुरकुरीत तळला जातो. हा पदार्थ पार्टी स्नॅक म्हणून प्रसिद्ध आहे.
कोरियन स्पायसी फ्राइज – कुरकुरीत कोरियन फ्रेंच फ्राइजची कोरियन स्ट्रीट फूडमध्ये सर्वात जास्त मागणी आहे. या कोरियन फ्रेंच फ्राईज मध्ये तिखट कोरियन ग्लेझवापरले जाते तसेच भरपूर चीज वापरले जाते
१४९ रुपयांपासून खवय्येप्रेमींना बर्गर किंग इंडियामध्ये झणझणीत आणि जीभेला रेंगाळणाऱ्या कोरियन अन्नपदार्थांची चव चाखता येईल. हे सर्व पदार्थ देशभरातील सर्व बर्गर किंग रेस्टॉरंट्समध्ये डायन-इन, टेकअवे आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहेत. डील्स आणि अपग्रेड कॉम्बोज या पर्यायात ग्राहकांना कोरियन अन्नपदार्थांचा आस्वाद घेता येईल.