कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सध्या परिस्थिती शांत आणि नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलिस धिकाऱ्यांनी सांगितले.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये ८ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. यापैकी ८ आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. याबाबत जांगीपूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) आनंद रॉय म्हणाले की, पोलिसांनी हिंसाचाराची स्वतःहून दखल घेतली आहे आणि गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या ८ एप्रिल रोजी वक्फ सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजकंटकांनी अनेक वाहनांना आग लावली होती. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश होता. या संघर्षादरम्यान निदर्शकांनी दगडफेकही केली, ज्यामुळे अनेक पोलिस जखमी झाले. दरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत १२ याचिका दाखल झाल्या आहेत. आगामी १६ एप्रिल रोजी न्यायालय १० याचिकांवर सुनावणी करणार आहे. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभरात निषेध करणार आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…