दुबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील.प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. अद्याप पात्रता प्रक्रियेबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी यजमान देश असलेल्या अमेरिकेला थेट प्रवेश मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
(हा फोटो १९०० च्या पॅरिस ऑलिंपिकमधील क्रिकेट स्पर्धेचा आहे. त्यानंतर ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सच्या संघांनी त्यात भाग घेतला)
याआधी फक्त एकदाच, १९०० मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन संघांनी सहभाग घेतला होता. फक्त एकच सामना खेळवण्यात आला होता, आणि तोच अंतिम सामना म्हणून घोषित करण्यात आला. या लढतीत ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक तर फ्रान्सने रौप्यपदक पटकावले होते.
लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमधील सर्व खेळांचे सामने लॉस एंजेलिस येथे खेळवण्यात येणार आहेत. मात्र ऑलिंपिक मधील क्रिकेट सामने कुठे खेळवले जातील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्यू यॉर्क शहर सामन्यांचे यजमानपद मिळवण्यासाठी शर्यतीत असल्याची माहिती आहे.
याआधी १९९८ आणि २०२२ मध्ये दोनदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तसेच २०१०, २०१४ आणि २०२३ मध्ये तीनदा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटला स्थान मिळाले. चीन मध्ये झालेल्या २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटात आपले संघ पाठवले आणि भारताने दोन्हीमध्ये सुवर्णपदके जिंकली.
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…